मुंबई: ऑस्कर्स २०२५मध्ये किरण राव यांचा सिनेमा ‘लापता लेडीज’ला मोठा झटका बसला आहे. आमिर खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला हा सिनेमा ९७व्या अॅकेडमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये होता. मात्र वाईट बातमी ही आहे की हा सिनेमा या शर्यतीतून बाहेर झाला आहे. या न्यूजमुळे चाहते मात्र निराश झालेत.
‘लापता लेडीज’ सिनेमा झाला बाहेर
मंगळवारी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टंस अँड सायन्सेजने पुढील राऊंडसाठी निवड झालेल्या १५ सिनेमांची घोषणा केली. यात किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या सिनेमाचा समावेश नव्हता. एकूण १५ सिनेमे पुढील राऊंडसाठी सिलेक्ट झाले.
हे आहेत निवड झालेले १५ सिनेमे
ब्राझील, आई एम स्टिल हेयर
कॅनडा, युनिव्हर्सल लँग्वेज
चेक गणराज्य, वेव्स
डेनमार्क, द गर्ल विद द नीडल
फ्रान्स, एमिलिया पेरेज़ (Emilia Pérez)
जर्मनी, द सीड ऑफ द सेक्रेड फिग (The Seed of the Sacred Fig)
आइसलँड, टच
आयरलँड,नीकैप
इटली, वर्मीग्लियो
लातविया, फ्लो
नॉर्वे, आर्मंड (Armand)
फिलिस्तीन, फ्रॉम ग्राउंड झिरो
सेनेगल, दाहोमी
थायलँड, हाउ टू मेक मिलियन्स बिफोर ग्रँडमा डाइस
युनायटेड किंगडम, संतोष
‘लापता लेडीज’ने इतकी केली होती कमाई
‘लापता लेडीज’ हा सिनेमा १ मार्च २०२४ला रिलीज झाला होता. यात नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने २०.५८ कोटींची कमाई केली होती. तर वर्ल्डवाईड २७.०६ कोटी रूपये कमावले होते.