मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदारांसाठी (Investors) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय शेअर बाजारात तीन मेन बोर्ड आयपीओ (IPO) लिस्ट होणार आहेत. या आयपीओचा गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत ते आयपीओ.
विधान परिषद सभापतीपदासाठी राम शिंदेंना उमेदवारी, आज दाखल करणार अर्ज
विशाल मेगा मार्ट
विशाल मेगा मार्टचा आयपीओच्या माध्यमातून ८ हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न होता. हा आयपीओ २९ पट सबस्क्राइब झाला होता संस्थात्मक आणि गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या आयपीओला मोठ्या प्रमाणात सबस्क्राइब केलं होतं. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा ७८ रुपये निश्चित केला होता. ग्रे मार्केट प्रीमियमचा विचार केला असता आयपीओचं लिस्टींग १०० रुपयांच्या जवळपास होऊ शकतं. त्यामुळं गुंतवणूकदारांना प्रतिशेअर २८ टक्के परतावा मिळू शकतो.
वन मोबिक्विक सिस्टीम्स
स्टॉक एक्सचेंजवर वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या आयपीओचं जीएमपी ५८ टक्के म्हणजेच १६० रुपये दाखवत आहे. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा २७९ रुपये प्रतिशेअर निश्चित केला होता. जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास एक शेअर ४४० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ १२६ पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी १४२ पट आयपीओ सबसक्राइब केला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयपीओ १२६ पट सबस्क्राइब केला होता. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून ५७६ कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न आहे.
साई लाइफ सायन्सेस
साई लाइफ सायन्सेसच्या आयपीओचं (Sai Life Sciences Limited IPO) जीएमपी विशाल मेगा मार्ट किंवा मोबिक्विक पेक्षा कमी आहे. आयपीओचा जीएमपी १३ टक्के असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास प्रतिशेअर परतावा ७२ रुपये मिळू शकतो. कंपनीनं किंमतपट्टा ५४९ रुपये निश्चित केला होता. जीएमपीनुसार आयपीओ ६२१ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. कंपनीचा आयपीओद्वारे ३०४२ कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न होता. हा आयपीओ १०.२७ पट सबस्क्राइब झाली होती.