Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; १० मिनिटांमध्ये काय घडलं?

Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; १० मिनिटांमध्ये काय घडलं?

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला दणक्यात विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसुद्धा निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. मात्र आता नागपूरच्या विधीमंडळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उद्धव ठाकरें यांच्यासोबत हजर होते. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ६-७ मिनिटं चर्चा झाली.



नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे देखील आज विधिमंडळात आले होते. नागपूरमध्ये येताच सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीनं आश्चर्य व्यक्त होत आहे.





राजकीय पक्ष म्हणून शुभेच्छा


आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे. हे ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं राज्याच्या हिताच्या सूचना आम्ही करु, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर दिली.

Comments
Add Comment