Saturday, March 22, 2025
HomeमहामुंबईMumbai Pollution : प्रदूषणाच्या विळख्यात अडकली मुंबईची हवा

Mumbai Pollution : प्रदूषणाच्या विळख्यात अडकली मुंबईची हवा

मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईची हवा सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत असली, तरी शिवाजीनगर – गोवंडी आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता ‘वाईट’, नेव्ही नगर – कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर चिंतित झाले आहेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी १४९ इतका होता. नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ३१५ इतका होता, तर गोवंडी शिवाजीनगर आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली.

Georgia Resort : जॉर्जियातल्या रिसॉर्टमध्ये आढळले ११ भारतीयांचे मृतदेह

तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २१८, २१३ इतका होता. या केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. अशा हवेत हृदय किंवा फुप्फुसांचा आजार असलेल्यांनी, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जास्त काळ राहू नये. तसेच शक्य असल्यास मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हवेची गुणवत्ता घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्त्रोतांद्वारे होणारे प्रदूषण कारणीभूत नसून मुंबईतील बांधकामांचाही परिणाम यावर होत आहे. अधून-मधून मुंबईतील दृश्यमानताही बाधित होत असते. त्यामुळे हवेमध्ये अति सूक्ष्म प्रदूषकांसोबतच तुलनेने मोठ्या आकाराचीही प्रदूषके असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -