
मुंबई : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील हे पुन्हा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे यांनी दिली.
दरम्यान, 'उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातले जाणार नाही. ज्यांना स्वतः च्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल. तसेच सामूहिक आमरण उपोषणाला कोणी बसले नाही, तरी मी बसणार' असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

६ जणांचा जागीच मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी भावनगर : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात भीषण अपघात (Gujarat Accident) झाल्याची घटना घडली आहे. एक खासगी बस आणि ट्रकची जोरदार ...