Monday, February 10, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियात ५० विकेट घेणारा जसप्रीत बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज 

ऑस्ट्रेलियात ५० विकेट घेणारा जसप्रीत बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज 

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळवला जात आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पावसाने खेळात व्यत्यय आणला नाही आणि पूर्ण खेळ पार पडला.या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे.

दुसऱ्या दिवशी भारताकडून फक्त जसप्रीत बुमराहची ताकद दिसून आली. गाबा टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट्स घेतल्यावर बुमराह ऑस्ट्रेलियात 50 विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा बुमराह हा दुसरा गोलंदाज आहे. बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 19 इनिंग्समध्ये 50 विकेट्स घेतल्या, दरम्यान त्याचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट हा 42.82 इतका होता. तर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियामध्ये 51 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत, त्यावेळी त्यांच्या गोलंदाजीचा स्ट्राईक रेट हा 61.50 इतका होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुढील टेस्ट सामन्यात बुमराहने अजून 2 विकेट्स घेतल्या की तो कपिल देव यांचा रेकॉर्ड देखील मोडेल.जसप्रीत बुमराह हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एका इनिंगमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने या देशांविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळताना तब्बल 8 वेळा पाच विकेट्स घेतल्या. यापूर्वी कपिल देव यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. कपिल यांनी 7 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये 2024 मध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. याबाबतीत आर अश्विन याने 46 विकेट्स घेतल्या असून तिसऱ्या क्रमांकावर 45 विकेट्स घेणारा शोएब बशीर आहे तर रवींद्र जडेजाच्या नावावर 44 विकेट्स आहेत. बुमराहने 2024 या वर्षात आतापर्यंत 11 टेस्ट सामने खेळले यात त्याने तब्बल 50 विकेट्स घेतल्या. मागील 22 वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने अशी कामगिरी केली नव्हती. यापूर्वी कपिल देव यांनी दोनदा तर जहीरने एकदा अशी कामगिरी केली होती. कपिल देव यांनी वर्ष 1979 आणि 1983 तर जहीर खानने 2002 मध्ये एका कॅलेंडर वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -