मुंबई: गाबा कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने बॅटिंगमध्ये ती कमाल केलीये जी २१व्या शतकात याआधी कोणालाच करता आली नाही. बुमराह आणि काश यांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्तं १०व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी १९९१मध्ये झाली होती. ही भागीदारी मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांनी केली होती.
बुमराह आणि आकाशदीप यांच्याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ३३ धावांची होती. ही मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांची होती. आता बुमराह आणि आकाशदीप यांनी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली आहे. बुमराह आणि आकाश चौथ्या दिवशी खेळ समाप्त होताना नाबाद परतले आहेत.
गाबा कसोटीत भारताकडून १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी
जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप – नाबाद ३९ धावा(२०२४)
मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ – ३३ धावा (१९९१)
मोटगनहल्ली जयसिम्हा आणि उमेश कुलकर्णी – २२ धावा(१९६८)
वेंकटपती राजू आणि जवागल श्रीनाथ – १४ धावा (१९९१)
इशांत शर्मा आणि उमेश यादव – १४ धावा(२०१४)
फॉलोऑनने वाचला भारत
एकीकडे असे वाटत होते की भारताला फॉलोऑन मिळेल. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांच्या शानदार भागीदारीमुळे संघाला फॉलोऑनपासून वाचता आले. दोघांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १०व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली.