Saturday, February 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMilind Soman : पिंकाथॉनने आयोजित केलेल्या लांब शर्यतीत महिलांचा मोठा प्रतिसाद!

Milind Soman : पिंकाथॉनने आयोजित केलेल्या लांब शर्यतीत महिलांचा मोठा प्रतिसाद!

मुंबई : पिंकाथॉनचा​समारोप (Pinkathon) नुकताच मुंबईत झाला, हा महिलांसाठी दोन दिवसांचा कार्यक्रम होता. महिलांना त्यांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी प्रवृत्त करणे हा त्याचा उद्देश होता.

कार्यक्रमात विविध अंतराच्या लांब शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये हजारो महिलांनी भाग घेतला होता. फिटनेस आयकॉन आणि मॉडेल मिलिंद सोमण यांनी या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. मॅरेथॉन व्यतिरिक्त सुमारे पाच हजार महिलांनी आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित इतर उपक्रमांमध्ये भाग घेतला. पिंकाथॉनने ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती मोहीमही सुरू केली.

Georgia Resort : जॉर्जियातल्या रिसॉर्टमध्ये आढळले ११ भारतीयांचे मृतदेह

मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) म्हणाले, “सध्या खूप छान वाटत आहे कारण हे कोविड नंतर पहिल्यांदाच घडत आहे आणि ते invincible women’s runच्या सहकार्याने घडत आहे. येथील अंतर ३ किलोमीटर ते १०० किलोमीटर इतके आहे, त्यामुळे ज्या महिलांनी वर्षानुवर्षे ३ किलोमीटरने सुरुवात केली त्या आता १०० किलोमीटर, ५० किलोमीटर धावत आहेत, त्यामुळे खूप छान वाटते.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -