Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीGrinder Machine Kills : ग्राईंडर मशिनने घेतला १९ वर्षीय मुलाचा जीव; आधी...

Grinder Machine Kills : ग्राईंडर मशिनने घेतला १९ वर्षीय मुलाचा जीव; आधी शर्ट अडकून खेचला गेला …

मुंबई : मुंबईतल्या वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात एका कर्मचाऱ्याचा ग्राईंडर मशिनमध्ये अडकून धक्कादायक मृत्यू झाला. सूरज यादव (१९ वर्षीय) असं मृत तरुणाचं नाव आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे.

खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना त्या कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढलं. पण या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळं एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा मालकावर दाखल करण्यात आला आहे.

One Nation One Election: लोकसभेत सादर होणार एक देश, एक निवडणूक विधेयक

कसा घडला अपघात ???

सूरज यादव सचिन कोठेकर यांच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवर कामाला होता. त्याचा चुलत भाऊ महेश यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार चायनीज भेळ आणि भजी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ग्राईंडर मशिनवर तयार केला जातो. हे मशिन नरिमन भाटनगर येथील एका खोलीत ठेवले होते. सचिन यांनी सूरजला कच्चा माल आणण्यासाठी ग्राईंडर असलेल्या खोलीकडे पाठवले. सूरज मशिनमधून माल काढत असताना मशिनमध्येच अडकला. या संदर्भातील माहिती मिळताच सचिन कोठेकर आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पोलिसांच्या मदतीने सूरजला मशिनमधून बाहेर काढले. जखमी अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -