पहा संपूर्ण व्हिडिओ
पुणे : पुणे शहरातून (Pune News) एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पेट्रोल पंपावर निष्काळजीपणाने सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडाल्यामुळे कर्मचाऱ्याला स्वतः चा डोळा गमवावा लागला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Manoj Jarange Patil : २५ जानेवारीपासून मराठा आंदोलकांचे पुन्हा उपोषण!
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर ही धक्कादायक घटना घडली. रविवारी संध्याकाळी पीडित तरुण हर्षद गणेश गेहलोत एका दुचाकीमध्ये गॅस भरत होता.यावेळी अचानक गॅसचे नोझल त्याच्या तोंडावर उडाले. यामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून दुर्दैवाने त्याला आपला डोळा गमवावा लागला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरेआणि राहित हरकुर्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.