भांडूप : मुंबईतील भांडूपमध्ये (Bhandup News) धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. आईने अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे एका विद्यार्थ्याने स्वताचे जीवन संपवले असल्याचे उघडकीस आले आहे. (Mumbai Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, भांडूपमधीलपोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या रुणवाल ग्रीन्स इमारतीमध्ये ही घटना घडली. मृत मुलाची आई मुलाला वारंवार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत होती. सातत्याने अभ्यासामुळे आई ओरडत असल्याच्या त्रासाला कंटाळून वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी बेडरुममधील फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.
CM Devendra Fadnavis : संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलीस घटनास्थळी दाखल होत पीडित मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.