

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांनी दिली माहिती
मुंबई: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेच्या सॅन ...
आरेकर आणि हरिश्चंद्रे कुटुंबाचे पुर्वी पासुन जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे, हक्काने रात्री रवि आरेकर यांनी हरिश्चंद्रे यांना तबल्याची अडचण सांगितली व एखादा चांगला तबला असेल तर तात्पुरता द्यावा अशी मागणी केली तेव्हा हरिश्चंद्रे यांनी लगेचच त्यांना आपल्या दुकानातील तयार केलेला एक चांगला तबला दिला व सांगितले की, हा तबला गिऱ्हाईकाचा ऑर्डरचा आहे. नंतर मला परत आणून द्या. त्यानंतर दोन दिवसानी ज्या गिऱ्हाईकाचा तबला होता ते घायला आले. तेव्हा हरिश्चंद्रे यांनी आपल्या दुकानातील माणसाला रवि आरेकर यांचे कडून तबला घेऊन येण्यास पाठवले त्यावेळी रवी आरेकर यांनी दुकानात येऊन दत्ता हरिश्चंद्रे यांना सांगितले कि, झाकिर यांना तो तबला फार आवडला, अतिशय सुंदर तयार केला असल्या मुळे हा तबला मी घेऊन जातो असे झाकिर हुसेन यांनी सांगितले व जे काय पैसे असतील ते त्यांना देऊन टाक, पण हा तबला मला पाहिजे. यावरून उस्ताद झाकिर हुसेन यांना त्यावेळी कर्जत मधील तबल्याची जणू भुरळच पडली होती. ज्या गिऱ्हाईकाचा तबला होता ते गिऱ्हाईक म्हणजे कर्जत येथील रघुनाथ दगडे यांनी तो तबला विकत घेतला होता. त्यांना सविस्तर सांगितल्यावर, त्यांनाही आनंद वाटला, त्यांनी काही हरकत नाही असे मोठ्या मनाने सांगितले. त्यांना लगेच नवीन तबला दिवंगत दत्ता हरिश्चंद्रे याने तयार करून दिला.