नागपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतल आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ अन्वये उपस्थित केलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
Zakir Hussain : पद्मविभूषण वस्ताद झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ
‘बेस्ट’च्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना…
(विधानपरिषद, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/fahqrfMePC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या घटनेसाठी ‘सीआयडी’ची एक विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून फरार आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून एकास निलंबित करण्यात आले आहे. आरोपी कोणत्याही जाती, धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी तसेच कोणत्याही दबावाचा विचार न करता यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.