Tuesday, February 11, 2025
Homeकोकणसिंधुदुर्गNilesh Rane : आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका

Nilesh Rane : आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका

आ. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले

मालवण : आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक प्रहार करताना चांगलेच सुनावले. उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार.

तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे. त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो.

राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप दोन दिवसात – मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा. आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाही तर तुमच अजून कठीण होईल. जय महाराष्ट्र! असे निलेश राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -