Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडाJasprit Bumrah : ऑस्ट्रेलियात महिला कॉमेंटेटरकडून जसप्रीत बुमराहविषयी वादग्रस्त टिप्पणी

Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियात महिला कॉमेंटेटरकडून जसप्रीत बुमराहविषयी वादग्रस्त टिप्पणी

कॅनबेरा : गावसकर-बॉर्डर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस नक्कीच यजमानांच्या नावावर होता, पण या डावातही भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने छाप सोडली आहे. पण अशातच आता या मालिकेतील तिसऱ्या कसोटी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावरील वांशिक वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या सामन्यादरम्यान एका प्रसिद्ध महिला समालोचकाने बुमराहसाठी ‘प्राइमेट’ हा शब्द वापरला आहे. त्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

बुमराह सध्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ६ बळी घेतले आहेत.कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १२व्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने ब्रिस्बेन कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २ विकेट घेतल्या होत्या, तेव्हा कॉमेंट्री करताना ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट ली याने त्याचे खूप कौतुक केले होते. त्यानंतर इंग्लिश समालोचक इसा गुहा हि म्हणाली, “बुमराह हा संघाचा एमव्हीपी आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट जसप्रीत बुमराह. तो भारतासाठी सर्वात प्रभावी ठरला आहे. या कसोटी सामन्यासाठी त्याच्यावर इतका फोकस का आहे?” अशी वादग्रस्त कमेंट केली, ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. इसा गुहा हिने बुमराहसाठी ‘प्राइमेट’ हा शब्द वापरला आहे ज्याचा अर्थ ‘ मोठ्या बुद्धीचा माकड’ असा होतो. आता या कमेंटनंतर महिला कॉमेंटेटर मोठ्या वादात अडकली आहे. मात्र, भारतीय क्रिकेटपटूवर वांशिक टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासोबतही ही घटना घडली होती.

CM Devendra Fadnavis : संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८ मध्ये सामना खेळला जात होता. त्यावेळी भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगवर अँड्र्यू सायमंड्सला ‘माकड’ संबोधल्याचा आरोप झाला होता.यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरभजन सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.पण नंतर सचिनच्या साक्षीनंतर भज्जीवरील बंदी उठवण्यात आली. दरम्यान आता, इसा गुहाला ‘प्राइमेट’ म्हणताच लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. इसा असे काही बोलू शकते यावर काही लोकांचा विश्वास बसला नाही आणि काही लोकांनी तर अशा कमेंट्समुळे तिची कारकीर्द संपुष्टात येईल असा दावाही केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -