Friday, May 16, 2025

देशक्रीडाताज्या घडामोडी

Mohammad Irfan : पाकिस्तान संघात चाललंय काय? आता 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती

Mohammad Irfan : पाकिस्तान संघात चाललंय काय? आता 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट टीममधील (Pakistan Cricket Team) दोन दिवसांपूर्वी अष्टपैलू इमाद वसीम या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासात वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनेही निवृत्ती घेतली. यामुळे पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला. मात्र आता पाकिस्तान क्रिकेटमधील निवृत्तीचा ट्रेंड थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिग्गज खेळाडूनंतर आता सात फूट एक इंच उंचीचा वेगवान गोलंदाजाने संघाला रामराम केला आहे.



पाकिस्तान क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने (Mohammad Irfan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. 'मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या संघसहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहेत. प्रेम, उत्साह आणि अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद',असे इरफानने म्हटले आहे.


दरम्यान, इरफानच्या निवृत्तीमुळे पाकिस्तानला फारसा धक्का बसणार नसल्याचे समजत आहे. कारण हा खेळाडू अनेक दिवासांपासून संघातून बाहेर आहे. अलीकडेच त्याने प्रेसिडेंट चषकात खान संशोधन प्रयोगशाळांचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने २०१९ मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

Comments
Add Comment