Monday, May 12, 2025

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोच्या रुग्णालयात झाकीर हुसैन यांचे निधन झाले. खरंतर, त्यांना एका आठवड्याआधी झाकीर यांना सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा ब्लड प्रेशरही ठीक नव्हता. आरोग्यासंबंधित समस्यांमुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.


झाकीर हुसैन यांचा जन्म ९ मार्च १९५१मध्ये मुंबईत झाला होता. १९८८मध्ये झाकीर हुसैन यांना पद्मश्री, २००२मध्ये पद्मभूषण आणि २०२३मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तीन वेळा झाकीर हुसैन यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरैशी होते. तेही पेशाने तबलावादक होते. त्यांच्या आईचे नाव बीवी बेगम होते.


झाकीर हुसैन यांनी माहीम स्थित सेंट मायकल शाळेतून शिक्षण घेतले होते. तर मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. झाकीर हुसेन यांना 1999 मध्ये यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सने नॅशनल हेरिटेज फेलोशिप दिली, तेव्हा त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून ओळखले गेले.

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बँडने अलीकडेच जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या संगीतातून अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या देखरेखीखाली त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिला परफॉर्मन्स दिला होता. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलं होतं.

Comments
Add Comment