श्रीरामपूर (प्रतिनिधी) : आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीरामपूरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात फटाके फोडून व घोषणाबाजी करत हा आनंद व्यक्त करण्यात आला.
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रीपदाच्या नियुक्तीची बातमी दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियावरून समजताच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. श्रीरामपूर शहरात फटाके फोडत आणि “राधाकृष्ण विखे पाटील की जय” अशा घोषणा देत उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश मुदगुले, पोपटराव जाधव, भाऊसाहेब पाटील बांद्रे, गणेश राठी, विठ्ठल राऊत, जितेंद्र छाजेड, महेंद्र पटारे, रुपेश हरकल, महिला शहराध्यक्ष पुष्पा हरदास, तालुका महिला अध्यक्ष मंजुश्री ढोकचौळे, पूजा चव्हाण, अक्षदा आछडा, अंजली गायके, विशाल अंभोरे, भैय्या भिसे, विजय आखाडे, बाळासाहेब हरदास, असिफ पोपटिया, रवी पंडित, मिलिंदकुमार साळवे, पंकज करमासे, डॉ. ललित सावंज, योगेश ओझा, सुभोद शिवदेकर, निलेश गीते, प्रसाद बिलदीकर, महेश खरात, पप्पू कुऱ्हे, महेश ढोकचौळे, विजय सदाफळ, मंजित पठाण, सुनील ढोकचौळे, श्रेयस पाठकी, हसराज बतरा, साजिद शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूरमधील जल्लोषप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी “राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना आता अधिक वेग येईल,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत, “जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे,” असे सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात एकजुटीचे आणि विकासाचे वचन घेतले.