मुंबई: राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार(Maharashtra Cabinet Expansion) नागपुर येथे पार पडला. या हिवाळी अधिवेशनात भाजपकडून एकूण १९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये कणकणवली मतदार संघाचे आमदार नितेश नारायण राणे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या हस्ते नितेश राणे यांना मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेशजी राणे म्हणाले. नितेश राणे यांच्या रूपाने राज्यातील मंत्रिमंडळामध्ये तरूण चेहरा मिळाला आहे.
निवडणुकीत सलग तिसरा विजय
नितेश राणे सलग तिसऱ्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आहेत. नितेश राणे २०१४मध्ये पहिल्यांदा कणकवली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंत २०१९मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातही त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून विजय मिळवत हॅटट्रिक साधली.