Thursday, September 18, 2025

‘‘मजेशीर भांडण’’ - कविता आणि काव्यकोडी

‘‘मजेशीर भांडण’’ - कविता आणि काव्यकोडी
मुंग्या होत्या पोहत पाण्यात गप्पा मारीत दंग गाण्यात गाणे त्यांच खूपच गोड गप्पांना त्यांच्या नाही तोड तेवढ्यात पाण्यात आला हत्ती पोहण्यात म्हणतो मज्जा कित्ती मुंग्यांकडे मग पाहून हसला सोंडेने पाणी उडवीत बसला मुंग्या चिडून आल्या काठावर एक बसली त्याच्या पाठीवर बाकीच्या मुंग्या म्हणाल्या तिला हसतोय कसा बघ बुडव त्याला.

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) तिन्ही ऋतूंमध्ये खाणे हितकारक रूचकर, मधुर आहे अग्निदीपक रात्रीच्या वेळी मात्र खाऊ नये म्हणतात दुधात विरजण घालून काय बनवतात? २) भक्कम हा वृक्ष त्याचे आयुष्यही खूप श्रद्धा, महात्म्याचं जणू देखणं रूप ‘बरगद का पेड’ हिंदीत म्हणतात त्याला या दाढीवाल्या झाडाचं नाव काय बोला? ३) निसर्ग सारा येई मोहरून चैत्रपालवी पानोपानी सण सौख्याचा घेऊन येई मनोमनी आनंदगाणी वस्त्र तांबडे, माळ फुलांची साखरेची पदके मानाची काठीवरी झुलते लोटी सांगे कहाणी कोणत्या सणाची? उत्तर - १) दही २) वड ३) गुढीपाडवा
Comments
Add Comment