Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Weather Update : हुडहुडी वाढली! राज्यात तापमानाचा पारा घसरला

Weather Update : हुडहुडी वाढली! राज्यात तापमानाचा पारा घसरला

पाहा कुठे किती तापमान?

मुंबई : मागील आठवड्यापासून महाराष्ट्रभर थंडीने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरला असून वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे अनेक ठिकाणी दाट धुक्यांची चादर पसरली आहे. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)

मिळालेल्या माहितीनुसार, आज धुळ्यात ४.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर शहरात तापमान ११ अंशावर आले आहे. परभणीत थंडीने यावर्षीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आज परभणीच सर्वात निचांकी तापमान ४.६ अंशावर आले आहे. काल परभणीच तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. आज मात्र तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील एकदोन दिवस असेच तापमान राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. जिल्ह्यात सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान ७ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तोरणमाळ येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Weather Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा