Saturday, February 8, 2025
Homeमहत्वाची बातमीMaharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी घेतली शपथ

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी घेतली शपथ

राज्यपालांनी नागपुरात दिली पद व गोपनियतेची शपथ

नागपूर : महायुतीच्या नवनिर्वाचित सरकारमधील 39 सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आज, रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या लोकप्रतिनिधींना राजभवनात पद व गोपनियतेची शपथ दिली.

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह १२ जणांना मंत्रि‍पदे मिळली आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह १० खाती मिळणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 6 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय. नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपच्या १९ शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला असून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे मंत्रिमंडळात कमबॅक झाले आहे. भाजपतर्फे शपथ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये आमदार नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे ,जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे.

शिवसेनेतर्फे शपथ घेणाऱ्यांमध्ये उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांचा समावेश आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -