Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kumbh Mela 2024 : पुण्यातून कुंभमेळ्यासाठी धावणार १२ विशेष रेल्वेगाड्या

Kumbh Mela 2024 : पुण्यातून कुंभमेळ्यासाठी धावणार १२ विशेष रेल्वेगाड्या

पुणे : पुण्यावरून कुंभमेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. रेल्वेचा कमी दरात प्रवास सुरक्षित व चांगला असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची कुंभमेळात गर्दी असते. या मेळाव्यात अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष १२ गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.



या विशेष गाड्यांच्या तपशील संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर असून, त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे गाडी क्रमांक ०१४५५ पुणे ते मऊ जं. कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून दि. ८, १६, २४ जानेवारी व दि. ६,८ फेब्रुवारीला सकाळी १०.१० वाजता निघेल आणि पुढच्या दिवशी २२.00 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०१४५६ मऊ ते पुणे कुंभमेळा विशेष गाडी मऊ येथून (दि. ९, १७,२५ जानेवारी व दि. ७,०९ फेब्रुवारी रात्री २३.५० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पुण्याला पोहोचेल.

Comments
Add Comment