बीड : बीड जिल्ह्यात (Beed News) एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पेपर लिहत एका विद्यार्थ्याचा जीव गेला असल्याची घटना घडली आहे. बीडमधील के. एस. के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
EPFO Card : EPFO च्या नियमांत बदल; सदस्यांना लगेचच मिळणार PFचे पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये परीक्षा देत असताना एका २४ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिद्धार्थ मासाळ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो पदवीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देत होता. के एस के महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये गाठी तयार झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. (Beed News)