आ.आशीष शेलार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई : मुंबई महापालिकेचे अत्यंत महत्वाचे असणारे केईएम रुगणालय शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे रुग्णालयाचा प्रलंबित असलेला पुर्नर्विकासाच प्रस्ताव विचारात घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी व त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्या अशी मागणी करीत आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली.
मुंबई महालिकेचे केईएम रुग्णालय मुंबईतील अत्यंत महत्वाचे रुग्णालय असून या रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे सदैव या रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढत असून येथील यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. हे रुग्णालय २०२४ पासून आपले शताब्दी वर्षे साजरे करीत आहे. त्यामुळे या काळात विेशेष बाब म्हणून या रुग्णालयाचा विस्तार व पुर्नर्विकास करण्यात यावा अशी मागणी आमदार अॅड शेलार यांनी केली आहे. या रुग्णालयाच्या आवारातील जागेवर सुमारे ५०० खाटांचे नवे अद्यावत ३५ मजली रुग्णालय उभारण्याचे काम करण्याचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने तयार करुन विद्यमान परिसराच्या एका भागाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला होता. तथापि, विद्यमान हेरिटेज इमारतींच्या संरचनात्मक मर्यादा लक्षात घेता, सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आधुनिक आरोग्यसेवा तंत्रज्ञानाचा समावेश करणे अधिक कठीण होते. त्यामुळे रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन पुर्नविकासाचा तातडीने विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊन हे काम पालिकेने हाती घ्यावे अशी विनंती आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली आहे.
Wadhavan : वाढवण बंदराच्या जोडरस्ता जमीन अधिग्रहणासाठी हालचाली सुरू
केईएममधील डीनचा बंगला जतन केला पाहिजे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी नर्सिंग कॉलेजच्या इमारतीच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून केईएम रुग्णालयातील ऐतिहासिक असणारा अधिष्ठांताचे निवासस्थानाची वास्तू (डिन बंगला) पाडल्याबद्दलही चिंता व्यक्त केली. डीनचा बंगला हा केवळ वास्तुशिल्पाचा खूणच नव्हता केईएमच्या समृद्ध वारशाचेही प्रतिक आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, माजी डिन, प्राध्यापक सदस्य आणि माजी विद्यार्थ्यांनीही या बांधकामाला विरोध करणारे लेखी निवेदन दिले होते. “केईएम रुग्णालयाची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी डिनचा बंगला जतन करणे आवश्यक आहे.