शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांचे आदेश
नाशिक : हिवाळा हा शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. या शैक्षनिक सहल खासगी बसमधून नेण्यात येतात. मात्र या सहलींबाबात शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.
नागपूर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला अमरावती रोडवर देवरी पेंढरी गावाजवळ अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
यावेळी तपासादरम्यान बसचालकाकडे परवाना नसल्याचे आणि शाळेने सहलीसाठी शिक्षण विभागाची अधिकृत परवानगीदेखील घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी करत, शाळांच्या सहलीसाठी खासगी बसेसचा वापर करण्यास बंदी घातली आहे.
Lal Krishan Advani : प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालकृष्ण अडवाणी पुन्हा दिल्लीतील रुग्णालयात दाखल
त्याचबरोबर आता केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा वापर करावा आणि वाहकांची शारीरिक स्थिती योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
काय आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश?
१.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच सहल न्यायी.
२.शालेय सहलीसाठी शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी.
३.सहलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र घ्यावे.
४.कुठल्याही विद्यार्थ्याला सहलीची सक्ती केली जाऊ नये.
५.सूचनांचे पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करणार.