मुंबई : डिसेंबर महिना जवळ आला की सर्वानाच ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे वेध लागतात. ख्रिसमसमध्ये येणार सिक्रेट सांता हा एक प्रकारचा एक गमतीशीर गिफ्ट एक्सचेंज गेम किंवा देवाण घेवाणचा सण आहे जो आता सर्वत्रच उत्साहाने सेलिब्रेट केला जातो. यामध्ये प्रत्येक व्यक्ती गुप्तपणे दुसऱ्या व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करते, ज्याचं नाव आधीच लकी ड्रॉद्वारे ठरवले जाते. गिफ्ट देणाऱ्याचे नाव शेवटपर्यंत गुप्त ठेवले जाते, त्यामुळे या गेमची मजा आणि उत्सुकता वाढते. ऑफिस, शाळा, कॉलेज सगळीकडेच त्याचा उत्साह दिसतो. ऑफिसमध्ये देखील सिक्रेट सांताक्लॉज होऊन एकमेकांना भेटवस्तू देण्याची एक गंमतीशीर पद्धत या दिवसांत असते. आपल्या सहकाऱ्यांना सिक्रेट सांताक्लॉज होऊन भेटवस्तू द्यायच्या तर कुणासाठी काय निवडायचं असा प्रश्न पडणं साहजिक आहे. प्रहारकडून तुम्हाला काही कल्पना सुचवण्यात आल्या आहेत त्या नक्की तुम्हाला कामी येतील.
1) सेंटेड कँडल्स
मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यासाठी सेंटेड कँडल्स घेऊ शकता. हा एक चांगला पर्याय आहे.
2) ड्राय फ्रूट्स कुकीज
हिवाळ्यात कुकीज खायला कोणाला आवडत नाही आणि थंडीत कॉफीसोबत कुकीज असतील तर मजा वेगळीच असते. तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुकीज गिफ्ट म्हणून देऊ शकता.
3) वॉलेट
मुलीला किंवा मुलाला गिफ्ट देण्यासाठी तुमच्या बजेटनुसार वॉलेट हा एक उत्तम पर्याय आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन जाऊन तुम्ही खरेदी करू शकता.
4) इंडोर प्लांट
ऑफिस डेस्कवर ठेवण्यासाठी लाइव्ह इनडोअर प्लांट्स देखील एक चांगला पर्याय आहे.
5) कॉफी मग
तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कॉफी मग देखील विकत घेऊ शकता. ऑफिसमध्ये कॉफी मग सर्वजण वापरतात आणि हे सहज वापरता येणारा पर्याय आहे. तुम्ही स्पेशल मॅसेज असलेला किंवा फोटो मग देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता.
6) ईयर पॉड्स किंवा ईयर फोन
आता बरेचजण हे ब्लूटूथ इयरफोन्स आणि ईयर पॉड्स वापरतात. पण तुमच्या जवळच्या किंवा खास व्यक्तीच नाव आलं असेल तर तुम्ही हे नक्की देऊ शकता. ईयर पॉड्स किंवा ईयर फोन प्रत्येकाला कधी ना कधी उपयोगी पडेल असे आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन तसेच अनेक सेल तसेच डिस्काउंट ऑफर लागलेल्या असतात. तेव्हा तुमच्या बजेटनुसार तुम्ही ईयर पॉड्स किंवा ईयर फोन विकत घेऊ शकता.
7) बॅग
सिक्रेट सांतानिमित्त तुम्ही सहकाऱ्याला गिफ्ट म्हणून बॅग देऊ शकता. जर तुमचा सहकारी हा जास्त फिरस्ता असेल तर ट्रॅव्हल बॅग, बॅगपॅक किंवा लॅपटॉप बॅग इत्यादी गिफ्ट करू शकता.
8) साडी
तुम्हाला जर कोणत्या महिला सहकाऱ्याला सिक्रेट सांतानिमित्त गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही साडी निवडू शकता. तुमच्या बजेटनुसार साड्या सर्वच मार्केटमध्ये उपलब्ध असतात. अशावेळी सिल्क, शिफॉन, कॉटन इत्यादी साड्या तुमच्या महिला सहकाऱ्याला आवडू शकतील.
9) गरम पाण्याच्या बॉटल
अनेकजण हिवाळा तसेच पावसाळ्यात गरम पाणी पिण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे हे असे गिफ्ट आहे जे सर्वांना उपयोगी येऊ शकतं. बाजारात गरम पाण्याच्या अनेक सुंदर नक्षीदार बॉटल उपलब्ध आहेत, तेव्हा तुमच्या बजेटनुसार तुम्ही विकत घेऊ शकता.
10) गॉगल
गॉगल ही सर्वानाच उपयोगात येणारी गोष्ट आहे. तेव्हा तुमच्या बजेटनुसार तुम्ही सहकाऱ्यासाठी गॉगल किंवा चष्म्याची फ्रेम विकत घेऊ शकता.
11) टिफिन बॉक्स
ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी टिफिन बॉक्स हा नेहमी उपयोगी पडतो. आता बाजारात लहान मोठे, लीक प्रूफ, इलेकट्रीक असे अनेक प्रकारचे टिफिन बॉक्स उपलब्ध असतात. तेव्हा सिक्रेट सांतानिमित्त गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही याची निवड नक्कीचं करू शकता.
12) मोबाईल कव्हर
मोबाईलला कव्हर घालण्यासाठी सर्वानाच आवडत. सध्या बाजारात अनेक हटके आणि वेगळ्या स्टाईलचे मोबाईल कव्हर उपलब्ध आहेत. सध्या ट्रॅव्हलिंग आणि कॉफी डिझाईन थीमचे मोबाईल कव्हर ट्रेंडमध्ये आहेत.
13) घड्याळ
मुलांना गिफ्ट द्यायचं असेल तर घड्याळ हा चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार मुलांना चांगल्या क्वालिटीचे घडयाळ गिफ्ट देऊ शकता.
14 ) अत्तर किंवा परफ्यूम
सिक्रेट सांतानिमित्त गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही अत्तर किंवा परफ्यूम सुद्धा गिफ्ट करू शकता.
15) मिनिएचर वस्तू
हल्ली बाजारात अनेक मिनिएचर स्वरुपातल्या वस्तू मिळतात. ख्रिसमस आहे तर मिनिएचर ख्रिसमस ट्री, मिनिएचर सांताक्लॉज, मिनिएचर योगा गर्ल, मिनिएचर ग्रामोफोन अशा बऱ्याच भेटवस्तू उपलब्ध आहेत तुम्ही नक्की निवडू शकता.