Tuesday, May 13, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू

Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू

मुंबई: तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये गुरूवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका खाजगी रुग्णालयात आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक मुलगा आणि ३ महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये तिघांची स्थिती गंभीर आहे. या सर्वांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मिडिया रिपोर्टनुसार रुग्णालयाच्या आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यानंतर लोकांना बाहेर काढून १० सरकारी अॅम्ब्युलन्स आणि ३० खाजगी अॅम्ब्युलन्सच्या मदतीने दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.



दुर्घटनेप्रकरणी कलेक्टर यांचे विधान


या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा कलेक्टर यांचे विधान आले आहे. त्यांनी एजन्सीला सांगितले की १० वाजण्याच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात आग लागली होती. रुग्णांना वाचवून जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांबाबतची माहिती डॉक्टरांनी पुष्टी दिल्यानंतरच दिली जाईल.

Comments
Add Comment