Saturday, October 25, 2025
Happy Diwali

साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, मारहाणीत ३ जखमी

साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, मारहाणीत ३ जखमी

सातारा : सातारा जिल्ह्यात एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबालांसह ही रेव्ह पार्टी सूरु होती. या रेव्हपार्टी दरम्यान झालेल्या भांडणामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कुठलीही पोलीस कारवाई होत नसल्याने या पार्टीला सातारा पोलिसांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर नुकतीच एक रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला सुद्धा नाचवल्या गेल्या आहेत. पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला आहे. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

साताऱ्यातील रेव्ह पार्टीच्या या घटनेचे व्हिडिओ तीन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असतानाही पोलिसांनी सपशेल डोळेझाक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलंय हा अशी शंका उपस्थित होत आहे.दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, पोलीस चौकशीतून काय बाहेर येते ?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, पोलीस तपास किती जलद गतीने होतो हेही पाहावे लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >