Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेडोंबिवलीच्या निवासी परिसरात पुन्हा प्रदूषण वाढले, नागरिक हैराण 

डोंबिवलीच्या निवासी परिसरात पुन्हा प्रदूषण वाढले, नागरिक हैराण 

डोंबिवली: एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यात रासायनिक प्रदूषण वाढल्याचा तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस रासायनिक गॅस हा रात्री, पहाटे, सकाळी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरात, गावांत सोडण्यात येत आहे. विधानसभा निवडणुक आचारसंहितेचा काळात या प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते.

वाढत्या प्रदूषणाबाबत येथील काही ज्येष्ठ, तरुण नागरिक सुरेखा माधव जोशी, वसंत शिंदे, महेश नाईक इत्यादीजण आपल्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी व इतर अधिकाऱ्यांकडे दूरध्वनी आणि मेसेज द्वारे अशा तक्रारी केल्याचे समोर येत आहे. त्या तक्रारी नंतर काही अधिकारी तपासणीसाठी येतात तेव्हा सदर हा विषारी गॅस गायब झालेला असतो असे अनुभव लोक सांगत आहेत. प्रदूषण संदर्भात तक्रारी नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामा या संघटनेतील पदाधिकाऱ्याला पाठवून त्यांच्याकडून चौकशी, तपासणी केली जात असल्याचे समोर येत आहे. अशा व्यवस्थेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबाबत विश्वासार्हता राहिली नाही अशी चर्चा होत आहे.

यामुळे सद्य स्थितीत काही जण येथील आपली घरे विकून किंवा भाड्याने देवून येथून सोडून जावू लागले आहेत. डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात याबद्दल विचारले तर ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करा असा सल्ला देतात. यापुढेही असेच रासायनिक प्रदूषण होत राहिले तर येथील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात असून एमपीसीबी, एमआयडीसी कार्यालयावर धडक मारून त्याच्या जाब विचारणार आहेत. याबात एमआयडीसीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -