Saturday, February 8, 2025
Homeमहाराष्ट्रSSC- HSC Exam Update : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल ‘ॲप’ची निर्मिती

SSC- HSC Exam Update : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल ‘ॲप’ची निर्मिती

प्रश्नपत्रिका, टाइम टेबलचे मिळणार अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, प्रारुप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका, अन्य माहिती या अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शिक्षक यांच्यासाठी हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या चुकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो.

Shirdi Sai Temple : थ्रीडी स्कॅनिंग डाटा संरक्षण; २० डिसेंबर रोजी साई मंदिर राहणार पावणेतीन तास बंद

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या ‘एमबीएसएसई’ या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंडळाचे संकेतस्थळ असले, तरी सध्याच्या काळात मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरू शकते. गुगल प्ले स्टोअरवरून, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील दुव्याद्वारे अ‍ॅप्लिकेशन विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल संकेतस्थळावर जाहीर केला जातो. मात्र, आता हा निकाल येत्या काळात अ‍ॅप्लिकेशनद्वारेही देण्याचे नियोजन आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाचे अनोखे पाऊल

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दहावी- बारावीच्या परीक्षा, राज्य मंडळासंदर्भातील समाजमाध्यमांतील माहितीची सत्यासत्यता अ‍ॅप्लिकेशनद्वारे पडताळता येईल. या अ‍ॅप्लिकेशनवर दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, गेल्या दोन वर्षांतील प्रारुप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका आणि अन्य सूचना, माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -