Monday, May 12, 2025

देशमनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मोठी बातमी : अल्लु अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?

मोठी बातमी : अल्लु अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?

हैदराबाद : दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रसिद्ध सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक केली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. आज त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.



'पुष्पा २' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक


हैदराबाद येथील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनला अटक केल्याची माहिती आहे. अल्लू अर्जूनचा पुष्पा २ चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रीमियरला अल्लू अर्जून याने हजेरी लावली. 'पुष्पा' येणार म्हणून त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड पूर्णपणे उडाली.






हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई


अभिनेता अल्लू अर्जूनचा सर्वत्र मोठा चाहतावर्ग आहे. त्याने पुष्पा २ च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यूसुद्धा झाला. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.


Comments
Add Comment