Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडी'हाऊसफुल-५' च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत

‘हाऊसफुल-५’ च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल-५’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिले चार सीक्वेल्स सुपरहिट ठरले. त्यांनतर आगामी सीरिज साठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या मुंबईत ‘हाऊसफुल 5’ चे शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यान स्टंट करत असताना अभिनेत्याचा अपघात झाला आहे. या अपघातात अक्षय कुमारला दुखापत झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. शुटिंगवेळी अ‍ॅक्शन सीक्वेंस करत असताना अभिनेत्याच्या डोळ्याला मार लागला आहे, असं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर लगेच सेटवर नेत्ररोग तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. नेत्ररोग तज्ज्ञांनी अभिनेत्याला डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले आहे. शिवाय इतर सहकलाकारांनी त्यांच्या शूटिंगला सुरूवात केल्याचंही कळतंय. लवकरच अभिनेताही सेटवर जॉईन होईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तथापि, दुखापत असूनही, अक्षयने चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच शूटिंगमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला आहे आणि त्याला उशीर होऊ नये अशी त्याची इच्छा आहे.

बहुचर्चित आणि मल्टिस्टारर ‘Housefull 5’ हा सिनेमा ६ जून २०२५ ला रिलीज होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाच्या शूटिंगला युरोपमध्ये सुरुवात झाली होती. या सिनेमाच्या निमित्ताने वेलकमनंतर अक्षय कुमार आणि नाना पाटेकर अनेक वर्षांनी एकत्र येणार आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित ‘Housefull 5 मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. हाऊसफुल 5 मध्ये फ्रँचायझीचे अक्षय आणि रितेश देशमुख तसेच अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गिस फाखरी यांच्या पुनरागमनासह उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये फरदीन खान, दिनो मोरिया, जॉनी लीव्हर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग आणि सौंदर्या शर्मा यांचा समावेश आहे. हे सगळे कलाकार प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -