मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावकर यांचा कर्नाटक विधानसभेतून फोटो हटवल्याचे प्रकरण सुरू आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्याचे कृत्य अतिशय निंदाजनक आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही. ते झोपलेत की काय? जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारण्याचे नाव घेत नाहीत अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
कर्नाटक सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवला. हा फोटो हटवत त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या भूमिकेला मूर्त रुप दिले आहे. राज्यात जेव्हा राहुल गांधी येतात तेव्हाही विरोधी भूमिका घेतात. सावरकरांचा अपमान होणे हे अतिशय निंदाजनक कृत्य आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे मात्र गप्प आहेत. त्यांनी काँग्रेसचा निषेध का केला नाही. ते काँग्रेसच्या कळपातून बाहेर येत नाही. जनतेने या निवडणुकीत त्यांना चांगलेच धुवून काढले आहे. अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. फडणवीस हे समन्वय साधणारे नेते आहेत. फडणवीस, पवार आणि शिंदे योग्य तो समन्वय राखत काम करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही हेच असेल.