नाशिक : नाशिकचे तापमानमध्ये मोठी घट झाली असून सोमवारी नाशिकचे तापमान 9.4 डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले आहे. एका दिवसात तीन डिग्री सेल्सिअसने तापमान कमी झाले आहे. या थंडीचा मोठा फटका द्राक्ष बागायतीना बसणार आहे. त्यामुळे ते हवालदील झाले आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल वादळामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला होता म्हणून ढगाळ हवामानामुळे उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणारे थंडी वारांचा परिणाम कमी होऊन राज्यात काही काळ दमट आणि उष्ण हवामान निर्माण झाले होते. परंतु आता राज्यामध्ये थंडी परत आली असून त्यामुळे पुन्हा एकदा हुडहुडी भरु लागलेली आहे. थंडी परतल्यानंतर आता नाशिकच्या तापमानामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ती घट होऊ लागली असून एका रात्रीतून 3.1 डिग्री सेल्सिअस तापमान कमी झाले आहे. रविवारी पहाटे नाशिकचे तापमान 12.6 डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले होते तर सोमवारी सकाळी नाशिकचे तापमान हे 9.4 डिग्री सेल्सिअस झाले होते.
अचानक थंडी पुन्हा परतल्यामुळे वातावरणात गारवा जाणू लागला आहे. शहरातील काही भागांमध्ये शेकोट्या पेटून नागरिक ऊब घेतानाचे दृश्य देखील दिसून येत आहे. निफाडच्या तापमानामध्ये देखील घट झाली असून मिळालेल्या माहितीनुसार निफाडचे तापमान हे 6.7 कांदा डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. दरम्यान या थंडीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार असून द्राक्ष वाचविण्यासाठी आता मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. पारा घसरत असल्याने पाणी उतरत असलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय द्राक्षवेलीच्या विकास खुंटणार असल्याने पुरेसे पाणी देणे अथवा शेकोटी पेटविणे यासारखे उपाय द्राक्ष बागाईतदारांना करावे लागणार आहेत. गहु हरभरा कांदा या रब्बी हंगामातील पिकांसाठी मात्र थंड हवामान पोषक असल्याचे तज्ञ व अनुभवी शेतकर्यांचे मत आहे.