बांगलादेश विरोधी हिंदू न्याय यात्रा सिंधुदुर्गात लक्षवेधी ठरली!
आ. निलेश राणे, आ. नितेश राणे व आ. दीपक केसरकर यांचा सहभाग
सिंधुनगरी : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर भारत देशातील हिंदू पेटून उठतील, व या देशातील बांगलादेशीना हाकलून देण्यासाठी देशातील हिंदू नागरीक एक होतील. मुस्लिमांचा हा अत्याचार यापुढे या देशात काय जगातही कोणताच हिंदू सहन करणार नाही! हिंदूंचा तिसरा डोळा उघडला तर बांगलादेश आडवा होईल. व जगातील हिंदूंच्या संरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे हिंदूंनो सावध व्हा, संघटित रहा व जशास तसे उत्तर द्या असे आवाहन करतानाच आपल्या देशातील बांगलादेशीना व इस्लामिक कट्टरपंथीयांना हिंदू नेते आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी धोक्याचा इशारा दिला.
सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतलेले हे न्याय यात्रा आंदोलन मंगळवारी सिंधू नगरी येथे झाले.आरएसएसचे जिल्हा कार्यवाह लवू महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे हिंदू आंदोलन झाले. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू, आरएसएसचे विभाग सहकार्य डॉक्टर पंकज दिघे, आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. तत्पूर्वी सिंधुदुर्ग नगरी फाट्यावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून या मोर्चास त्याच ठिकाणावरून प्रारंभ झाला व मोठ्या संख्येने महिला हिंदू बांधव सामील असलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी भवनावर येऊन त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सभा आटोपल्यानंतर निवडक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यावर या मुक मोर्चाचा समारोप झाला.
हजारो हिंदूंसोबत आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत या यात्रेमध्ये सहभागी झाले.
बांगलादेशींना हाकलण्यासाठी हिंदूंचा तिसरा डोळा उघडेल: आमदार नितेश राणे
बांगलादेशातील हिंदूंना संपूर्ण संरक्षण द्या. त्यांचे होणारे हाल, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि हिंदू बांधवांच्या केल्या जाणाऱ्या हत्या बांगलादेश सरकारने त्वरित थांबले नाहीतर तर महारष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू तिसरा डोळा उघडेल तेव्हा हे बांगलादेशी लोक औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील हिंदूचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत मात्र पाच मिनिट पोलिसांना सुट्टी दिली तर हिंदूंवर वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना किड्यांप्रमाने चिरडून टाकू, असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
हिंदु रक्तात हवा ; कृतीतून दिसलाच पाहिजे
आ. निलेश राणे यांनी आक्रमक शैलीत मांडली सडेतोड भुमिका
बांगलादेश येथे हिंदूंवर वर्षभर अत्याचार सुरु आहेत. माता, भगिनी यांच्यावर होणारे अत्याचार अमानुष आहेत. हा मोर्चा ही सुरुवात आहे. हिंदूंवरील हे अत्याचार थांबलेच पाहिजे. यासाठी लक्ष वेधण्यासाठी मोठया संख्येने आपण आज एकवटलो. मोदी सरकार निश्चितच योग्य ती भुमिका घेईल. बांगलादेशी यांच्या घश्यात हात घालून हे थांबवले जाईल. बांगलादेशाला आडवे करायला मोदी साहेबांना ४८ तास पुरे आहेत, हे सगळे होईलच. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले त्यानुसार जसा शत्रू तसे आपल्याला राहावे लागेल. शांतताप्रिय राहणे यावृत्ती समोर होणार नाही. कारण यांना जगावर त्यांचा धर्म बसवायचा आहे. हिंदूंना घेरले जात आहे. आमची भाषा तिखट आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ऐकत मोठे झालो. आपल्या देशात गणपती, रामनवमी, हनुमान जयंती उत्सव रॅलीत दगडफेक केली जाते. ही वृत्ती ठेचलीच पाहिजे. हे युद्ध आहे आणि ते जिंकायचे आहे. आमच्या जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे. आपल्यातही हिंदु म्हणून कडवटपणा हवा. आमच्या हिंदु धर्माला जिवंत ठेवायचे आहे. यासाठी हिंदु रक्तात हवा. कृतीतून हिंदुपणा दिसलाच पाहिजे. आमचा नितेश हिंदु समाज, पक्ष हाक देतो त्या त्या वेळी दिवस रात्र केव्हाही हिंदूंसाठी तयार असतो, असे आ. निलेश राणे यांनी सांगताना आमदार नितेश राणे यांचे विशेष कौतुक केले.
या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मीय सहभागी झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना हिंदू धर्मीयांनी निवेदन दिले.
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू धर्मीयांवर अत्याचारा विरोधात हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली. या ठिकाणी बांगलादेश येथे होणाऱ्या हिंदू धर्मियांवर अन्याया संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच विविध हिंदू धर्मीय संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.