अमरावती : इंग्रजी शाळांचा खर्च पाहता मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकांचा हक्क आहे. यासाठीच राज्य शासनाने ग्रामीण व दुर्बल भागातील शिक्षण बाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.
शासनाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, या आधुनिक स्पर्धात्मक युगात गावापासून काही अंतरावर असलेल्या शहरात व मोठ्या गावातील इंग्रजी माध्यमाच्या कान्व्हेंट इंग्रजी शाळांमध्ये महागडे शुल्क भरून आपल्या मुला-मुलींना शिकवणीचा प्रयत्न सध्याचे पालक करीत आहेत.
केवळ एक फॅशन व स्पर्धा म्हणूनकरावी लागते. परिणामी परिसरात अनेक पालक कर्जबाजारी होऊन इंग्रजी शाळेचा खर्च पूर्ण करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असल्यामुळे शिस्तीच्या नावाखाली आणि आपल्या गावापासून शाळेपर्यंत येणे-जाणे करण्यासाठी बसची सुविधा आहे. ऐपत नसतानाही पालकांनी मोफत शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे खाजगी शाळेच्या इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढला आहे. मराठी शाळेतून विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, काही पालक याकडे दुर्लक्ष करून ऐपत नसतानाही महागड्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करून घेतात. मात्र, नंतर गरीब सामान्य पालकांना इंग्रजी शाळेचा खर्च पेलवत नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मराठी शाळेतील मोफत शिक्षणाकडे पालकांची पाठ, इंग्रजी शाळांना पसंती