मुंबई : कुर्ल्यातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलं आहे. बुद्ध काॅलनी येथे काल रात्री अपघात झाल्याने पोलीसांनी कुर्ला स्टेशन बंद केल्याने बसमार्ग ३७,३२०,३१९,३२५,३३०,३६५ आणि ४४६ बसेस कुर्ला आगारातुन चालतील तसेच सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बसमार्ग ३११,३१३ आणि ३१८ च्या बसेस टिळक नगर यु वळण घेऊन कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रुझ स्टेशन जातील.
देशातील ९९४ संपत्तींवर वक्फचा अवैध ताबा, केंद्राची संसदेत माहिती
बसमार्ग ३१० च्या बसेस पण टिळक नगर पुल येथे यु वळण मारुन बांद्रा बस स्थानक जातील. सदर परावर्तन सकाळ पहिल्या बस पासुन चालु आहे.त्यामुळेच बेस्ट प्रशासनाकडून बेस्ट स्थानक बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.