अहिल्यानगर : मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिजाऊ व्याख्यात्या अनिता काळे पाटील यांची दुबई येथे होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. महिला सक्षमी करण व महिलांचे संघटन करुन सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या अभ्यास दौऱ्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
M.S.Dhoni : क्रिकेट पाठोपाठ जाहिरातींच्या जगातही धोनी ठरतोय ‘किंग’
महाराष्ट्रातून जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयुरा देशमुख,प्रा.शारदा जाधव व नगरच्या अनिता काळे या तीन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.काळे या जिल्ह्यातून निवड होणाऱ्या एकमेव महिला आहेत .जिजाऊ ब्रिगेडचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन २० ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान अबुधाबी (दुबई) येथे होत आहे.यामध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये महिलांची सामाजिक परिस्थिती व भविष्यातील वाटचाल यासंदर्भात विचारमंथन होणार आहे.अनिता काळे या भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून,सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे.व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल मराठा समन्वय परिषद व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.तर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.