Wednesday, February 5, 2025
Homeताज्या घडामोडीPMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच येणार ४०० बस

PMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच येणार ४०० बस

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) अधिकाऱ्यांनी ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसच्या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) पाहणी केली असून, त्याच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. लवकरच बसच्या उत्पादनाला सुरुवात होईल.

फेब्रुवारीमध्ये ४०० नवीन सीएनजी बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातून दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक होईल.‘पीएमपी’मध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन बसचा प्रश्‍न रेंगाळला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळूनही बसखरेदीला उशीर झाला. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. आता नवीन बस खरेदीला गती प्राप्त झाली आहे.

नुकतेच ‘सीआयआरटी’ व ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नवीन बसच्या प्रोटोटाइपची पाहणी केली. त्याबद्दल दोन्ही संस्था सकारात्मक असून, लवकरच उत्पादनास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ४०० बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन केले आहे.

दररोज ४५ बस ब्रेकडाउन!

‘पीएमपी’च्या ताफ्यात २ हजार १०० बस असल्या, तरीही प्रत्यक्षात १ हजार ६५० बस धावतात. त्यापैकी सुमारे ४५ बस दररोज ब्रेकडाउन होतात. शिवाय आयुर्मान संपलेल्या बसची संख्याही जास्त आहे. त्यामुळे प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत आहे. यात नवीन बसची खरेदी होणे खूप आवश्यक होते. नव्या बसमुळे प्रवासी सेवा सुधारेल. सध्या बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.

पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील ४०० बस दाखल होतील. दुसऱ्या टप्प्यात स्वमालकीच्या २०० बस दाखल होणार आहेत. दोन्ही बस ‘सीएनजी’वर धावतील. बसची संख्या वाढल्याने पीएमपीची प्रवासी सेवा अधिक चांगली होण्यास मदत मिळेल

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -