Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकुर्ला परिसरात भरधाव बसने ३० जणांना उडवले, ४ जणांचा मृत्यू तर २५...

कुर्ला परिसरात भरधाव बसने ३० जणांना उडवले, ४ जणांचा मृत्यू तर २५ जखमी

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक मोठा अपघात घडला. बेस्टची ३३२ नंबरची बस अनियंत्रित झाली आणि या बसने अनेक वाहनांना तसेच साधारण ३० लोकांना उडवली. त्यानंतर एका सोसायटीची भिंत तोडून थांबली. या भीषण अपघतात ४ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले.

या अनियंत्रित बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टची ही बस कुर्ला येथून अंधेरीला जात होती तेव्हा आंबेडकर नगरमधील बुद्ध कॉलनीजवळ या बसचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने ३० जणांना चिरडले. यात अनेकजण गंभीर जखमी झाले तर काहींचा जीवही गेला. जखमींना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर रस्त्यावर एकच गर्दी जमली. यामुळे गोंधळही झाला. स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करताना बस चालकाला ताब्यात घेतले. फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू आहे.

कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणारी ३२२ नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघाली. अचानक बसचा वेग इतका वाढला की जे कोणी समोर आले त्यांना धडक देत ही बस निघाली. अखेर सोसायटीच्या भिंतीला आदळल्याने ही बस थांबली.

चालक ताब्यात, तपास सुरू

पोलिसांनी बसच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. तसेच या अपघाताचे खरे कारण काय होते याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी याबाबत केस दाखल केली असून तपास केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -