Thursday, May 8, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Cold weather : पुन्हा थंडी आली हो! राज्यातील तापमानाचा पारा घसरला

Cold weather : पुन्हा थंडी आली हो! राज्यातील तापमानाचा पारा घसरला

मुंबई: गायब झालेली थंडी(Winter)राज्यात पुन्हा वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांतील तापमान एका दिवसांत ४ अंशांनी घसरले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच गारवा जाणवत आहे. राज्यातील तापमानात आणखी घसरण होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली होती. राज्यातील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता हे वादळ गेल्याने थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागले. तसेच गार वारेही वाहत आहेत.


पुण्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील तापमान २० अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे काही दिवस उकाडा जाणवत होता. मात्र आता पुन्हा तापमान घसरू लागल्याने थंडी परत आली आहे. रविवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी नाशिक, पुणे, खांदेश, धुळे तापमान अचानक घसरले. हे घसरलेले तापमान १८ डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


उंचीवरून वाहणाऱ्या उच्च वेगवान पश्चिम वाऱ्यांच्या झोतामुळे तापमानाचा पारा आणखी घसरेल. तसेच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरासह अनेक ठिकाणी बर्फ पडत आहे.

Comments
Add Comment