Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

A. R. Rahman : एआर रहमान इंडस्ट्रीतून घेणार ब्रेक? लेकीने सांगितले सत्य

A. R. Rahman : एआर रहमान इंडस्ट्रीतून घेणार ब्रेक? लेकीने सांगितले सत्य

मुंबई: भारतीय सिनेविश्वातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान(A. R. Rahman) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आले होते. त्यांनी २९ वर्षांचे त्यांचे वैवाहिक नाते संपवले. ए. आर. रहमान याने पत्नी सायरा बानो पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.घटस्फोटोनंतर आता ए. आर. रहमानच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी आणखी एक बातमी समोर येत आहे.पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर एआर रहमान करिअरमधून ब्रेक घेण्याची शक्यता आहे, असे बोलले जात होते. मात्र त्यांची मुलगी खतिजा रहमान हिने या चर्चांवर मौन तोडले आहे.

ए. आर. रहमान पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर करिअरमधून ब्रेक घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या चर्चेवर एआर रहमान यांची मुलगी खतिजा रहमान हिने एक्स प्लॅटफॉर्म म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर रहमान इंडस्ट्रीतून ब्रेक घेणार, या चर्चेसंदर्भातील एका पोस्टवर उत्तर देताना तिने लिहिले आहे की, 'कृपया अशा निरुपयोगी अफवा पसरवणे थांबवा' पण, करिअरमधून ब्रेक घेणार की नाही, यावर ए. आर. रहमानने भाष्य केलेलं नाही.

रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. गेल्या महिन्याच्या २० तारखेला रहमान यांनी त्यांच्या पत्नी सायरा यांच्यापासून विभक्त झाल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. तर नात्यातील भावनिक तणावामुळे हा निर्णय घेतल्याचे सायरा यांनी सांगितलं आहे. ए. आर. रहमान यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते. १९९२ मध्ये रोजा या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रहमान यांच्याकडे आज सुमारे २१०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. देश-विदेशात त्यांची अनेक आलिशान घरं असून त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.

Comments
Add Comment