नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये असलेल्या मडकीजाम येथे चेष्टामस्करीत दोन मित्रांच्या किरकोळ वादावादीत झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून, दिंडोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.
रात्री दत्तू चंदर रेहरे व वसंत नामदेव गांगोडे हे मित्र गावातील पिंपळाच्या पारावर गप्पा मारताना त्यांच्यात वाद झाला. यात वसंतने धारदार कोटराच्या सहाय्याने दत्तूवर वार केले. यात दत्तू रेहरे (५५) यांचा मृत्यू झाला. किरण दत्तू रेहरे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत वसंत गांगोडे यास अटक केली आहे. सपोनि गायत्री जाधव अधिक तपास करत आहेत.