
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये जमा केले जात होते. त्यांनतर आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यावर महायुती सरकारकडून २१०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. छाननीबाबत चुकीची चर्चा सुरू आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरीत्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच “एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला त्याबाबत माहिती नाही. पण तक्रारी असतील तरच त्याबाबतीतच छाननी होईल, या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,” असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

मुंबई: गायब झालेली थंडी(Winter)राज्यात पुन्हा वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांतील तापमान एका दिवसांत ४ अंशांनी घसरले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ...