Wednesday, April 23, 2025
Homeक्राईमMumbai Accident : करिअर सुरु होताच काळाचा घाला! भीषण अपघातात २५ वर्षीय...

Mumbai Accident : करिअर सुरु होताच काळाचा घाला! भीषण अपघातात २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू, आरोपी चालक फरार

मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रनची (Hit And Run) घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. बाईक आणि डंपरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. मुंबई पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Accident)

Subhash Ghai : दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे गुरुवारी भीषण अपघात झाला. शिवानी सिंह नावाची २५ वर्षीय मॉडेल तिच्या मित्रासोबत बाईकने प्रवास करत होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी वांद्रे पश्चिम येथील कलंत्री चौकात आली. यावेळी एका असता एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत शिवानीचा तोल गेल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर जखमी अवस्थेत स्थानिकांनी शिवानी आणि तिचा मित्र दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी शिवानी सिंहला मृत घोषित केले.

दरम्यान या घटनेनंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. टँकर जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, लवकरच आरोपी टँकरचालकाला अटक केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

करियरला सुरुवात होताच काळाचा घाला

मृत शिवानी सिंह ही २५ वर्षीय तरुणी मॉडेल असून ती मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे, ती चित्रपटसृष्टीत काम करते. शिवानी सिंहला नुकतेच इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र अशातच तिच्यावर काळाने घाला घातला. शिवानीच्या अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. (Mumbai Accident)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -