Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

असा हा माझा मित्र : कविता आणि काव्यकोडी

असा हा माझा मित्र : कविता आणि काव्यकोडी
माझा मित्र साहील आहे फारच भारी करूच शकत नाही कुणी त्याची बरोबरी उंच झाडावर चढण्यात तो आहे सराईत नदीत पोहून जाण्यात तर एकदम पटाईत एका दमात गावचा डोंगर जातो चढून अडचणींतून काढतो मार्ग नाही बसत दडून मित्रांच्या गप्पांत तर त्याची पाहावी कमाल किस्से सांगतो रंगवून उडवून देतो धमाल अभ्यासाच्या वेळी अभ्यास खेळाच्या वेळी खेळ अभ्यास आणि खेळाचा छान साधतो मेळ इतिहास, भूगोल त्याचा साराच तोंडपाठ अवघड गणिताचीसुद्धा तो सोडत नाही पाठ संकटात सापडले कुणी, मदतीला जातो धावून अभिमान वाटतो मला त्याच्याकडे पाहून स्वभावाने तो प्रेमळ वागण्यात फारच नेक असा हा माझा मित्र लाखांमधील एक ...!

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) अतीथंड हवामान अल्पायुषी वनस्पती कॅरिबू, रेनडिअर दिसतात सभोवती स्लेज गाडीचा वापर राही इग्लूंच्या घरात एस्किमो लोक सांगा दिसे कोणत्या प्रदेशात? २) नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी समाजात समतेची भावना केली जागी सद्विचारांची पताका पंजाबपर्यंत नेली कुणाची पदे शिखांच्या गुरूग्रंथसाहिबात सामावली? ३) भगवद्गीतेवर मराठीत भावार्थदीपिका ग्रंथ रचिला सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला अवघ्या विश्वासाठी त्यांनी मागितले पसायदान वारकरी सांप्रदायातील हे संत कोण महान? उत्तर - १) टुंड्रा प्रदेश २) संत नामदेव ३) संत ज्ञानेश्वर
Comments
Add Comment