मुंबई: विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या दिवशी सकाळी प्रलंबित लोकप्रतिनिधींचा शपथविधी झाल्यानंतर सभागृहात महायुती बहुमत सिद्ध करेल. त्यानंतर मतदानाद्वारे अध्यक्षपदाची निवड केली जाईल.
सध्या विधानसभेत महायुतीचे २३७ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी अधिवक्ता राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान विरोधी पक्षाकडून एकाही सदस्याने अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे निवड बिनविरोध असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.