मुंबई: जिओचे(Jio) अनेक रिचार्ज प्लान्स सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. यात विविध किंमतींना विविध रिचार्ज प्लान्स आहेत. तसेच फायदेही विविध मिळतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान सांगत आहोत.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा आणि बरंच काही मिळेल. जिओचा हा ४९७ रूपयांचा प्लान आहे. हा प्लान व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये लिस्टेड आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ६ जीबी इंटरनेट मिळते.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडीचा समावेश आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्जमध्ये युजर्सला टोटल १००० एमएमएसचा वापर करण्यास मिळतो.
जिओचा हा ४७९ रूपयांचा प्लान संपूर्ण ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. जिओचा ४७९ रूपयांचा रिचार्ज प्लान जिओ पोर्टल आणि My jio app वर प्रीपेड रिचार्जच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये मिळेल.