Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीFarmers Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा दिल्ली चलो एल्गार! शंभू सीमेवरून १०१ शेतकरी...

Farmers Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा दिल्ली चलो एल्गार! शंभू सीमेवरून १०१ शेतकरी कूच करणार

नवी दिल्ली : दिल्लीत संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु असून यापार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे (Farmers Protest) हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा ‘दिल्ली चलो’चा (Delhi chalo) नारा दिला असून किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएम गटातील १०१ शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार आहेत. परंतु हे आमदोलन रोखण्यासाठी पंजाब-हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्या आहेत.

शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर हमीसह त्यांच्या चिंता आणि मागण्यांबाबत केंद्राकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज त्यांनी १०१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दुपारी १२ च्या सुमारास दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यादरम्यान केंद्राने शेतकरी आणि मजुरांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला असून ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. त्यामुळे यावेळी ते शांततेत आणि शिस्तीने दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले.

Japan : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

नवीन भूसंपादन कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ नंतर संपादित केलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला मिळायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षांपासून गौतम बुद्ध नगरमध्ये सर्कलचे दर वाढलेले नाहीत. नवीन भूसंपादन कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू झाला पाहिजे. भूसंपादनाच्या बदल्यात १० टक्के विकसित जमीन द्यावी आणि ६४.७ टक्के दराने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासाचा लाभ मिळावा. उच्चाधिकार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. लोकसंख्या असलेल्या क्षेत्राची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे सर्व निर्णय शासनस्तरावर घ्यायचे आहेत.

पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा

पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी काल सकाळी तयारी केली होती. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी टाकलेल्या बॅरिकेडमुळे थांबावे लागले. बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि आंदोलकांना मागे जाण्यास भाग पाडले. (Farmers Protest)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -